Skip to main content

भारताचे स्थान



भारत पूर्व गोलार्धात मध्यवर्ती स्थानी आहे, तर दुस– या प्रकारे तोउत्तर गोलार्धात येतो. भारताच्याप्रचंड आकारामुळे त्यास उपखंड म्हणतात. भारतीय उपखंडात भारत, मालदिव, पाकिस्थान भुतान, नेपाळ, बांग्लादेश व श्रीलंका यांचा समावेश होतो. भारताची मुख्य भुमी आशिया खंडाच्या दक्षिणेस ८ ० ४ उ. ते ३७ ० ६ उ. अक्षांश ६८ ० ७ पू. ते ९७ ० २५ पू. रेखावृत्तापर्यंत पसरलेली आहे. भारताचे अति दक्षिणेचे टोक म्हणजे इंदिरा पॉइंट ( ग्रेट निकोबार ) ६ ० ३० उत्तर अक्ष वृत्तावर आहे. कर्कवृत्त भारताच्या मध्यातून जाते. ( गुजरात, राजस्थान, छत्तीसगड, मध्यप्रदेश, झारखंड, प. बंगाल, त्रिपूरा, व मिझोराम ) भारताचे दक्षिण टोक विषुववृत्तापासुन ८७५ कि.मी. अंतरावर आहे. भारताची पूर्व – पश्चिम लांबी २९३३ कि.मी. असून उत्तर दक्षिण लांबी ३२१४ कि.मी. इतकी आहे.


भारताच्या सीमा व क्षेत्रफळ :-भारताचे क्षेत्रफळ ३२,८७,२६३ चौ.कि.मी. असून क्षेत्रफळाच्या दृष्टीने जगात भारताचा सातवा क्रमांक लागतो. भारताने जगाचे २.४२ % क्षेत्रफळ व्यापले आहे. जगातील सर्वात मोठे देश आकारानुसार १) रशिया २) कँनडा ३) चीन ४) अमेरिका ५) ब्राझील ६) ऑस्ट्रेलिया व ७) भारत भारताच्या मुख्य भूमीच्या किनारपट्टीची लांबी ६१०० कि.मी. आहे, तर एकूण समुद्री किनारपट्टीची लांबी ७५१६ कि.मी. आहे. भारताची जल सीमा किना–यापासुन १२ नॉटिकल मैल लांबी आहे. भारतात सर्वाधिक किनारपट्टी गुजरात राज्याला लाभलेली आहे. यानंतर आंध्रप्रदेशाचा क्रमांक लागतो. भारतास एकूण १५,१६८ कि.मी. लांबीचीभू-सीमा लाभली आहे. ती खालील प्रमाणे-
संबंधित देश- सीमेचे नाव - लांबी

चीन - मॅकमोहन रेषा - ४२५०कि.मी.
नेपाल १०५० कि.मी.
पाकिस्थान रॅडक्लिफ लाईन ४०९०कि.मी.
भूतान ०४७५ कि.मी.
बांग्लादेश रॅडक्लिफ लाईन ३९१०कि.मी.
अफगाणिस्थान
ब्रम्हदेश १४५०कि.मी.
भारताच्या दक्षिण बाजूस हिंदी महासागर आहे. पश्चिम बाजूस अरबी समुद्र तर पूर्वेस बंगालचा उपसागर आहे. समुद्रमार्गे श्रीलंका हा देश भारतास सर्वात जवळ आहे. मन्नारचे आखात व पाल्कच्या सामुद्रधुनीमुळ श्रीलंका भारतापासून वेगळी झाली आहे.

भारताची प्राकृतीक रचना:भारताचे प्राकृतिक दृष्ट्या खालील पाच भाग पडतात.
उत्तर भारतीय पर्वतीय प्रदेश
उत्तरेकडील मैदाने
द्विकल्पीय पठार
किनारी मैदाने
भारतीय बेटे
भारताचा १०.७% भाग पर्वतीय, १८.६% भाग डोंगराळ, २७.७% पठारी व४३% भाग मैदानी प्रदेशाचा आहे.

भारतीय उपखंडाची निर्मितीः-
भारतीय उपखंड
आल्फ्रेड वेगनर याने या विषयी भूखंड वहन सिधांन्त मांडला. सद्याच्या हिमालय व मैदानी भागातपूर्वी टेथिस नावाचा समुद्र होता. टेथिसच्या उत्तरेस लॉरेशिया (अंगारा भूमी) व दक्षिणेस गोंडवाना भूमी होती. या महासागराचा विस्तार भारत- म्यानमारच्या सीमेपासून अटलांटिक महासागरातील गिनीच्या खाडीपर्यंत होता. दोन्ही बाजूच्या जमिनीच्या झीज होऊन ती टेथिस महासागरात जमा झाली. दोन्ही भूखंडाच्या परस्परांकडे सरकण्यामुळे गाळास वळ्या पडून पर्वताची निर्मिती झाली. या पर्वताची झिज होऊन गाळ टेथिस समुद्रात जमा झाली. अशा प्रकारे मैदानांची निर्मिती झाली.

१) उत्तरेकडील पर्वतमय प्रदेशः-पर्वतमय प्रदेश
जगाचे छप्पर म्हणून ओळखले जाणार्या पामिर पठारापासून अनेक पर्वत श्रेणी निघालेल्या आहेत. यातील कुनलून पर्वत श्रेणी तिबेटकडे, तर काराकोरम काश्मिरकडे प्रवेश करते. यातच अक्साईचीनचे पठार आहे. बाल्टोरो व सियाचीन या येथील प्रमुख हिमनद्या आहेत. काराकोरमच्या दक्षिणेस अनुक्रमे लडाख व झास्करपर्वत रांगा आहेत. कैलास पर्वतावर सिंधू नदी उगम पाऊन लडाख व झास्कर पर्वत रांगातून वायव्येकडे वाहत जाते.

हिमालय पर्वतः- सिंधू व ब्रह्मपुत्रा नदीच्या मध्ये असणार्या पर्वत श्रेणीस हिमालय म्हणतात. याची लांबी २५०० किमी. असून रूंदी १५० ते ४०० किमी आहे. भारत-म्यानमार सीमेवर यास पूर्वाचल म्हणतात. हिमालयास तरुणपर्वत असे म्हणतात. भारतातून तिबेटकडे जातांना हिमालयाच्या खालील रांगा लागतात.

अ) शिवालिक किंवा उपहिमालयः-ही सर्वात कमी उंचीची पर्वत रांग आहे. मॄदेची सर्वाधिक झीज हिमालयाच्या या सर्वात तरुण भागात होते.याची सरासरी उंची १००० ते १२०० मी व रुंदी १० ते ५० कि.मी. आहे. या रांगेस नद्यांनी अनेक ठिकाणी छेदले असुन त्यास पश्चिमेसडे डून (उदाः- डेहराडुन, कोथरीडून,) व पूर्वेकडे द्वार म्हणतात. (उदाः- हरीद्वार)

ब) लघु हिमालय/ मध्य/लेसर/ हिमालयः-याची सरासरी रुंदी ८० किमी व उंची ४००० ते ५००० मी. इतकीआहे. निसर्ग सौंदर्यामुळे हे ठिकाण पर्यटकांचे आकर्षण ठरले आहे. उदाः- डलहौसी, धर्मशाळा, शिमला, मसुरी, नैनिताल, राणीखेत व दार्जिलिंग इ. यातच काश्मिर खोरे व काठमांडू खोरे आहे. यातील पर्वतउतारावरील गवताळ प्रदेशास काश्मिरमध्ये मग असे म्हणतात. (सोनमर्ग, गुलमर्ग) तर गढवाल हिमालयात यास बुग्याल व पयार म्हणतात. झेलम व बियास नद्यांच्या दरम्यानची पिरपंजाल ही पर्वत रांग लेसर हिमालयातील सर्वांत लांब

रांग आहे. तसेच धौलपारु, नांगतिबा, महाभारत व मसुरी या पर्वत रांगा आहेत.

क) बृहत/ हिमाद्री/ग्रेटर हिमालयः-याची उंची सर्वाधिक म्हणजे सरासरी ६००० मी. आहे. येथे जगातील सर्वोच्च असणारे एव्हरेस्ट (नेपाल- ८८४८ मी. पर्वत) आहे. त्यास नेपाळमध्ये सागर माथा असे म्हणतात. इतर नंदादेवी, गंगा पर्वत इ.

ड) बाह्य हिमालय (ट्रान्स हिमालय):-यात काराकोरम व झास्कर पर्वत रांगा आहेत. के -२ किंवा गॉडविन ऑस्टिन हे जगातील द्वितीय क्रमांकाचे शिखर (८६११ मी.) काराकोरम पर्वत रांगेत आहे. हे भारतातील सर्वोच्च शिखर आहे.

Comments

Popular posts from this blog

जाणून घ्या बाबासाहेबांविषयीच्या दहा विशेष गोष्टी

डॉ. आंबेडकर १. प्रज्ञावंत बाबासाहेबांनी संपादित केलेल्या पदव्या : डॉ. आंबेडकरांनी तब्बल ३२ पदव्या संपादित केल्या होत्या. यामध्ये बीए, एमए, पीएचडी (अर्थशास्त्र), एमएससी (Provincial Decentralization of Imperial Finance in British India), बॅरिस्टर इन लॉ, डीएससी (The Problem of the Rupee – Its origin and its solution), एलएलडी (HIS achievements, Leadership and authoring the constitution of India), डी.लिट. या काही महत्वाच्या पदव्या आहेत. २. आंबेडकरांनी लिहिलेले महत्वाचे ग्रंथ : Caste in Hindu (1916), The problem of Rupee (1923), Annhilation of Caste (1935), Federation Versus Freedom (1939), Ranade, Gandhi and Ginnah (1943), Communal Deadlock and a Way to solve it (1945), What congress and Gandhi have done to the untouchables? (1945), Pakistan or Partition of India (1945), State and Minorities (1947), Maharashtra as a Linguistic state (1948), The untouchable (1948), Who were shudra (1945), Buddha and his Dhammas (1957). ३. डॉ. आंबेडकरांनी सुरु केलेली वर्तमानपत्रे : मूकनायक (१...

काहि महत्वाची कलमे

1. राष्ट्रपती - 52 2. उपराष्ट्रपती- 63 3. राज्यपाल -155 4. पंतप्रधान - 74 5. मुख्यमंत्री - 164 6. विधानपरिषद - 169 7. विधानसभा - 170 8. संसद - 79 9. राज्यसभा - 80 10. लोकसभा - 81 11. महालेखापरीक्षक :- 148 12. महाधिवक्ता - 165 13. महान्यायवादी - 75 14. महाभियोग - 61 15. केंद्रीय लोकसेवा आयोग - 315 16. निवडणुक आयोग - 324 17. सर्वोच्च न्यायालय - 124 18. उच्च न्यायालय- 214 19. जिल्हा न्यायालय- 233 20. राष्ट्रीय आणिबाणी - 352 21.राष्ट्रपती राजवट- 356 22.आर्थिक आणिबाणी-360 23. वित्त आयोग - 280 24. घटना दुरुस्ती - 368 25. ग्रामपंचायत - 40

🔹भारतातील विविध वृत्तपत्रे व संपादक दर्पण

 🔹भारतातील विविध वृत्तपत्रे व संपादक दर्पण - बाळशास्त्री जांभेकर - 6 जानेवारी 1832   दिग्दर्शन (मासिक) - बाळशास्त्री जांभेकर - 1840   प्रभाकर (साप्ताहिक) - भाऊ महाराज   हितेच्छू (साप्ताहिक) - लोकहितवादी गोपाळ हरी देशमुख   काळ (साप्ताहिक) - शी.म.परांजपे   स्वराज्य पत्र (साप्ताहिक) -  शी.म.परांजपे   केसरी - लोकमान्य टिळक   मराठा (इंग्रजी साप्ताहिक) - लोकमान्य टिळक   दिंनबंधू (साप्ताहिक) - कृष्णाराव भालेकर   समाज स्वास्थ (मासिक) - रघुनाथ धोंडो कर्वे   विध्यर्थी (मासिक) - साने गुरुजी   कॉग्रेस (साप्ताहिक) - साने गुरुजी   साधना (साप्ताहिक) - साने गुरुजी   शालापत्रक - कृष्णशास्त्री चिपळूणकर   उपासना (साप्ताहिक) - वी.रा.शिंदे   सुबोध पत्रिका - प्रार्थना समाज   महाराष्ट्र धर्म (मासिक) - आचार्य विनोबा भावे   मानवी समता -  महर्षी धो. के. कर्वे(समता संघ)   सुधारक (साप्ताहिक) - आगरकर   बहिष्कृत भारत (पाक्षिक) - डॉ.  बाबासाहेब आंबेडकर   म...