गृहनिर्माण व शहरी कामकाज मंत्रालयाच्यावतीने 9 नोव्हेंबर 2020 रोजी 13 व्या ‘अर्बन मोबिलिटी इंडिया’ (UMI) परिषदेचे आयोजन केले जाणार आहे. एक दिवस चालणारी ही परिषद आभासी पद्धतीने भरणार आहे.
या वर्षीचा कार्यक्रम “शहरी गतिशीलतेतला उदयोन्मुख कल” या मुख्य संकल्पनेवर आधारित असून लोकांना सुलभ आणि सोयीस्कर वाहतूक सुविधा पुरवण्यासंदर्भात कोविड-19 महामारीमुळे उद्भवलेल्या आव्हानांना सामोरे जाण्यासाठी राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पातळीवर केलेल्या नाविन्यपूर्ण उपायांवर भर दिला जाणार.
गृहनिर्माण व शहरी कामकाज मंत्री हरदीप एस. पुरी यांच्या हस्ते कार्यक्रमाचे उद्घाटन होणार आहे.
पार्श्वभूमी
भारतातले शहरीकरण ही 21व्या शतकाची वास्तविकता आहे, ज्याने जगातली सर्वात वेगाने वाढणारी मोठी अर्थव्यवस्था म्हणून भारताच्या विकासाला सुरुवात केली.
परिवहन विभाग हा शहरी अर्थव्यवस्थेचा एक महत्त्वाचा घटक आहे. मात्र वेगाने वाढणारी गतिशीलता, गरजा आणि तंत्रज्ञानाची उपलब्धता यामुळे वाहनांच्या मालकीपासून ते वाहन सामायिकरण आणि सार्वजनिक वाहतुकीकडे ओघ अपेक्षित आहे, त्यामध्ये बहू-पद्धती वेगवान संपर्क व्यवस्था आणि स्वच्छ गतिशीलता यावर जास्त भर देण्यात आला आहे.
हे उदयोन्मुख कल प्रवाशांच्या अपेक्षेत एक आमूलाग्र बदल घडवण्याची शक्यता आहे आणि आपल्या शहरांना वेगाने बदलणाऱ्या गतिशीलता गरजेनुसार बदल करण्याची गरज आहे. या समस्या सोडवण्यासाठी गृहनिर्माण व शहरी कामकाज मंत्रालयाने ‘राष्ट्रीय शहरी परिवहन धोरण, 2006’ प्रसिद्ध केले.
धोरणाचा एक भाग म्हणून, UMI म्हणून प्रसिद्ध असलेल्या ‘अर्बन मोबिलिटी इंडिया’ वर वार्षिक आंतरराष्ट्रीय परिषद-नि-प्रदर्शनी आयोजित करण्यासाठी मंत्रालयाने पुढाकार घेतला आहे. शहरांना माहिती प्रसारित करणे हे या परिषदेचे मुख्य उद्दीष्ट आहे. परिषदेला उपस्थित अधिकाऱ्यांना जागतिक स्तरावरील अद्ययावत व सर्वोत्तम नागरी वाहतुकीच्या पद्धतींची माहिती दिली जाते.
Comments
Post a Comment