भारत सरकारने पुढील मुख्य माहिती आयुक्त (CIC) या पदासाठी यशवर्धन सिन्हा यांची निवड केली आहे.
यशवर्धन सिन्हा हे वर्तमानात माहिती आयुक्तपदी आहेत. ते परराष्ट्र सेवेतले माजी अधिकारी आहेत.
केंद्रीय माहिती आयोग (CIC) विषयी
केंद्रीय माहिती आयोग ही ‘माहिती अधिकार अधिनियम-2005’च्या तरतूदीनुसार 12 ऑक्टोबर 2005 रोजी स्थापन केलेली एक वैधानिक संस्था आहे.
आयोगामध्ये एक मुख्य माहिती आयुक्त आणि जास्तीत-जास्त दहा माहिती आयुक्त असतात. त्यांची नेमणूक राष्ट्रपती करतात. मुख्य माहिती आयुक्त आणि माहिती आयुक्त 5 वर्षे किंवा वयाची 65 वर्षे यापैकी जे आधी घडेल तोपर्यंत पदावर राहतात.
Comments
Post a Comment