Skip to main content

वाक्यप्रचार व अर्थ



1)हातातोंडाची गाठ पडणे - कसेबसे खाण्यास मिळणे

2) गयावया करणे - केविलवाणी विनंती करणे

3)अंगाचा तिळपापड होणे - अतिशय संतापणे

4)पगडा बसवणे - छाप, प्रभाव पाडणे
मूग गिळणे - अपमान सहन करुन गप्प राहणे

5)वाटाण्याच्या अक्षता लावणे - नाकारणे

6)कस्पटासमान लेखणे - क्षुल्लक, कमी दर्जाचे समजणे

7)नामानिराळा राहणे - अलिप्त राहणे

8)द्त्त म्हणून उभा राहणे - अचानक येणे

9)जन्माची माती होणे - जीवन व्यर्थ होणे

10)चारी मुंड्या चीत होणे - संपूर्ण पराभव होणे

11)सर्द होणे - वरमणे, थिजून जाणे

12)रामराम ठोकणे - निरोप घेणे

13)आकाशपाताळ एक करणे - फार आरडाओरडा करणे

14)कानामागून येऊन तिखट होणे - मागाहून येऊन वरचढ होणे


15) उमाळा येणे - तीव्र इछा होणे

16) वर्ज्य करणे - टाकणे

17) काडीमोड करणे - संबंध तोडणे

18) अहमहमिका चालणे - चढाओढ लागणे

19) अगतिक होणे - उपाय न चालणे

20) कां-कूं करणे - एखादी गोष्ट करण्यास तयार नसणे

21) आभाळ फाटणे - मोठे संकट येणे

22) इडापिडा टळणे - संकट जाणे

23) उतराई होणे - उपकार फेडणे

24) अंतर्मुख होणे - स्वत:शी विचार करणे

25) लकडा लावणे - सारखी घाई करणे

26) परिपाठ ठेवणे - सवय ठेवणे

27) ब्रह्मांड कोसळणे - मोठे संकट येणे

28)कागाळी करणे - तक्रार करणे

29) खांदा देणे - मदत करणे

30) खोबरे करणे - नाश करणे

31) गय करणे - क्षमा करणे

32) न्यूनगंड वाटणे - कमीपणा वाटणे

33) जीव मुठीत घेणे - फार घाबरणे

34) जीव ओतणे - मन लावून काम करणे

35) सुपारी देणे - आमंत्रण देणे

36) तोंडाला तोंड देणे - उद्धटपणे बोलणे

37) डोळे दिपणे - आश्चर्य वाटणे

38) नामोहरम होणे - पराभूत होणे

39) पदर पसरणे - याचना करणे

40) पाणउतारा करणे - अपमान करणे

41) वाली नसणे - रक्षणकर्ता नसणे

42) हात तोकडे पडणे - मदत करण्यास क्षमता कमी पडणे

43) हिरमुसले होणे - नाराज होणे

44) पांग फेडणे - इच्छा पूर्ण करणे

45) विटून जाणे - त्रासणे

46) डोके सुन्न होणे - काही न सुचणे

47) फडशा पाडणे - संपवणे

48) गोरेमोरे होणे - लाज वाटणे

49)आकशाला गवसणी घालणे - अशक्य गोष्ट करुन पाहणे

50)धिंडवडे निघणे - फजिती होणे

61) आटापिटा करणे - खूप कष्ट करणे

62)माया पातळ होणे - प्रेम कमी होणे

63) वाऱ्यावर सोडणे - काही न विचारणे

64)हातपाय गाळणे - धीर सोडणे

65) कागदी घोडे नाचवणे - कृतिशील

 काम न करता कागदी पराक्रम गाजविणे

66) गुळणी फोडणे - स्पष्ट सांगणे

67)झाकड पडणे - अंधार पडणे

68)पोटात आग पडणे - खूप भूक लागणे

69)टोपी उडवणे - टवाळी करणे

70)पाणी पाजणे - पराभव करणे

71)वहिवाट असणे - रीत असणे

72)छी थू होणे - नाचक्की होणे

73)प्रादूर्भूत होणे - दिसू लागणे

74)दंडेली करणे - जबरदस्ती करणे

75)दिवा विझणे - मरण येणे

76)मूठमाती देणे - शेवट करणे

77) सुगावा लागणे - अंदाज लागणे

78)प्रतारणा करणे - फसवणूक करणे

79)डोक्यावर घेणे - कौतुक करणे

80)कानाशी लागणे - चहाडी करणे

81)किटाळ करणे - आरोप होणे

82)देव्हारे माजविणे - महत्व वाढविणे

83)हातावर तुरी देणे - फसविणे

84)बेगमी करणे - साठा करणे

85)सोन्याचा धूर निघणे - चांगली स्थिती येणे

86)पोटात तुटणे - वाईट वाटणे

87)नख लावणे - नाश करणे

88)डोळो निवणे - समाधान होणे

जॉईन करा:- @Mission_PSI_STI_ASO

Comments

Popular posts from this blog

बाळ शास्त्री जांभेकर

 बाळ गंगाधर जांभेकर   (जन्म १८१२; मृत्यू १८४६) हे मराठी पत्रकारितेचे जनक होते. त्यांनी ‘दर्पण’ नावाचे पहिले मराठी मासिक सुरू केले. इतिहास आणि गणित या विषयांवर त्यांनी अनेक पुस्तके लिहिली. रॉयल एशियाटिक सोसायटी आणि जिओग्राफिकल सोसायटीमध्ये वाचलेले शिलालेख आणि ताम्रपटांशी संबंधित त्यांचे निबंध खूप महत्त्वाचे आहेत. शिलालेखांच्या संदर्भात ते कनकेश्वर येथे गेले असता त्यांना उष्माघात झाला. यामध्ये त्यांचा मृत्यू झाला. खर्‍या अर्थाने त्यांनी आपल्या कार्यात जीव ओवाळून टाकला होता. ख्रिश्चन धर्माने ग्रहणाशी संबंधित वास्तव स्वतःच्या भाषेत आणि श्रीपती शेषाद्री नावाच्या ब्राह्मणाला सांगणे.हिंदू धर्मात पुनर्परिवर्तन केल्याबद्दल त्यांना बहिष्कृत करण्यात आले. ते महाराष्ट्राचे समाजसुधारक होते बाळ गंधाधर जांभेकर यांचा जन्म राजापूर जिल्ह्यातील पोंबर्ले गावात झाला. त्यांचे वडील चांगले वैदिक होते. शिक्षकांमध्ये बापू छत्रे आणि बापूशास्त्री शुक्ल यांचा समावेश होता. दादोबा पांडुरंग यांनी त्यांच्या आत्मचरित्रात त्यांच्या विलक्षण स्मरणशक्तीचा एक प्रसंग नमूद केला आहे. एकदा त्याने दोन गोरे सैनिक लढत...

महाराष्ट्र 2

1)महाराष्ट्र - जलाशय व धरणे* 1. कोयना - शिवाजी सागर - (कोयना) हेळवाक (सातारा) 2. जायकवाडी - नाथसागर (गोदावरी) औरंगाबाद 3. बाभळी प्रकल्प - (गोदावरी) नांदेड 4. भंडारदरा - (प्रवरा) अहमदनगर 5. गंगापूर - (गोदावरी) नाशिक 6. राधानगरी - (भोगावती) कोल्हापूर 7. मोडकसागर - (वैतरणा) ठाणे 8. उजनी - (भीमा) सोलापूर 9. तोतलाडोह - मेघदूत जलाशय (पेंच)- नागपूर 10. यशवंत धरण - (बोर) वर्धा 11. खडकवासला - (मुठा) पुणे 12. येलदरी - (पूर्णा) परभनी 2). महाराष्ट्र भुषण पुरस्काराचे मानकरी* 1. 1996 – पु. ल. देशपांडे (साहित्य) 2. 1997 – लता मंगेशकर (कला, संगीत) 3. 1999 – विजय भाटकर (विज्ञान) 4. 2000 – सुनील गावसकर 5. 2001 – सचिन तेंडुलकर (क्रीडा) 6. 2002 – भीमसेन जोशी (कला, संगीत) 7. 2003 – अभय बंग आणि राणी बंग (समाजसेवा आणि आरोग्यसेवा) 8. 2004 – बाबा आमटे (समाजसेवा) 9. 2005 – रघुनाथ माशेलकर (विज्ञान) 10. 2006 – रतन टाटा (उद्योग) 11. 2007 – रा. कृ. पाटील (समाजसेवा) 12. 2008 – नानासाहेब धर्माधिकारी (समाजसेवा) 13. 2008 – मंगेश पाडगावकर (साहित्य) 14. 2009 – सुलोचना लाटकर (कला, सिनेमा)...

पुराना नाम – परिवर्तित नाम

◆ हबीबगंज रेलवे स्‍टेशन – अटल बिहारी वाजपेयी रेलवे स्‍टेशन ◆फ़िरोजशाह कोटला स्टेडियम – अरुण जेटली स्टेडियम ◆भोपाल मेट्रो रेल – राजा भोज ◆बोगीबील पुल – अटल सेतू ◆नया रायपुर – अटल नगर ◆रोहतांग सुरंग (हिमाचल प्रदेश) – अटल सुरंग ◆बुंदेल खण्‍ड एक्‍सप्रेस-वे – – अटल पथ ◆हजरतगंज चौराहा  – अटल चौक ◆देवधर हवाई अड्डा (प्रस्‍ता.) – अटल बिहारी वाजपेयी हवाई अड्डा ◆अलीगढ़ – – हरिगढ़ ◆अहमदाबाद – कर्णावती ◆शिमला  – श्‍यामला ◆साहिबगंज हार्बर – अटल बिहारी वाजपेयी हार्बर ◆अगरतला हवाई अड्डा – महाराजा बीर बिक्रम हवाई अड्डा ◆छत्रपति शिवाजी एयरपोर्ट – छत्रपति शिवाजी महाराज इंटरनेशल एयरपोर्ट ◆कांडला बंदरगाह – – दीनदयालबंदरगाह ◆साबरमती घाट – अटल घाट ◆भामाशाह स्‍वास्‍थ्‍य बीमा योजना – भामाशाह सुरक्षा कवच ◆मुगल सराय रेलवे स्‍टेशन – प. दीनदयाल उपध्‍याय रेलवे स्‍टेशन ◆बल्‍लभगढ़ मेट्रो स्‍टेशन – अमर शहीद राजा नाहरसिंह मैट्रो स्‍टेशन ◆गोरखपुर हवाई अड्डा – महायोगी गोरखनाथ हवाई अड्डा ◆मियों का बाड़ा, गांव (बारमर, राजस्‍थान) – महेश नगर